न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- राज्यात लवकरच मान्सुन दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले असून, पिंपरी चिंचवड शहरात गेली दोन दिवस पावसाच्या सरी पडत होत्या. सध्या पाऊस थांबला आहे. मात्र, शुक्रवारी (दि. १४) रोजी पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी कमाल तापमान ३४ अंश तर किमान तापमान २८ अंश डिग्री सेल्सीयस होते.
दोन ते तीन दिवस वातावरण ढगाळ राहणार असल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली. शहरात दिवसभरात पावसाचे चिन्ह दिसत होते. मात्र, पावसाने हुलकावणी दिली. सायंकाळी वातावरणात गारवा होता. उन्हाच्या तडाखामुळे नागरिक हैराण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर वातावरणातील गारव्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. वातावरणातील बदलामुळे शहरात साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील अधिका-यांनी केले आहे.















