न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- चिंचवड येथील फेडरेशन ऑफ असोशिएशन ऑफ पिंपरी चिंचवड विभागाच्या वतीने उद्योग व्यवसायातील मंदी व केंद्र सरकारचे ई-कॉमर्सचे धोरण या विषयावर शुक्रवारी (दि. १४ रोजी) बैठक घेण्यात आली.
या बैठकीत १०० टक्के परकीय गुंतवणूक धोरणाचा विचार करण्यात यावा, छोट्या उद्योगांचा विचार करून परकीय गुंतवणूक करताना अटी व शर्ती घातल्या जाव्यात. परकीय खाद्यवस्तु म्हणजेच चायनीज सारख्या खाद्यपदार्थांवर निबंध घालण्यात यावेत, नवीन उदयास येणाया छोट्या उद्योगांसाठी नवीन हितकारक धोरण आखावीत, यासाठी मंडळाच्या अधिका-यांची धोरण ठरविणाऱ्या समितीत समावेश करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.
या बैठकीला माजी खासदार गजानन बाबर, चेंबरचे विनोद बन्सल, के. जे. बन्सल, गंगाराम पटेल, विनोद जैन, मावळ असोसिएशनचे सुरेश मोहिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.















