न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- वटपौर्णिमेला वडाच्या फांद्यांची पूजा न करता वडाच्या झाडाची पूजा करावी. फांद्याची पूजा करण्यासाठी वडाच्या झाडांची कत्तल करावी लागते. त्यामुळे फांद्याऐवजी झाडाची पूजा करावी, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने केले आहे.
मागील काही वर्षांपासून शहरी भागात वडाची फांदी घरी आणून पूजा केली जाते. यामुळे वडाचे जतन होण्याऐवजी त्याची कत्तल होत आहे. दुस-या दिवशी रस्त्यावर फांद्यांचा खच पडलेला दिसतो. यातून निसर्गाचं रक्षण करण्याऐवजी त्याचे भक्षण केले जात आहे. येत्या वटपौर्णिमेला गृहिणींनी आपापल्या परिसरातील वडाच्या झाडाची पूजा करावी. वडाच्या झाडांची लागवड करावी. कोणत्याही परिस्थितीत फांद्यांची पूजा करुन वडाच्या तोडीस प्रोत्साहन देऊ नये, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने केले आहेत.















