न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने वडमुखवाडी, चोविसावाडी व चऱ्होली परिसरातील एकूण ९ अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी (दि. १३) रोजी कारवाई केली.
कारवाईत एकूण १२ हजार ६३७.०४ चौरस फूट क्षेत्राचे बांधकाम पाडण्यात आले. सहशहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.















