न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- निगडी येथील अस्तित्व मॉलमध्ये आता स्मार्ट सिटी कार्यालयातंर्गत जी कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर (नियंत्रण केंद्र) सुरू केले जाणार आहे. त्यासाठी २ कोटी ३६ लाख रुपये इतका खर्च केला जाणार आहे.
महापालिका भवनात सध्या स्मार्ट सिटी कार्यालय कार्यरत आहे. नव्याने होणा-या कमांड आणि कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून महापालिकेला शहरात घडणा-या विविध घटनांवर लक्ष ठेवता येणार आहे.
महापालिकेची कार्यालये, रूग्णालय व अन्य इमारती या केंद्राला जोडलेल्या राहतील, संबंधित केंद्राला शहरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे आणि व्हिज्युअल मॅसेज डिसप्ले बोर्ड जोडले जातील.















