न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिंचवड येथील स्वामी विवेकानंद केंद्रातर्फे मंगळवार (दि. १८) ते गुरुवार (दि. २०) या कालावधीत ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवडगाव येथील भोईर सांस्कृतिक सभागृहात सकाळी सात ते नऊ या वेळेत हे शिबीर होणार आहे. ‘व्यक्तीच्या घडणीतून राष्ट्राची उभारणी’ या संकल्पनेतून हे शिबीर घेण्यात आले असून, ते सर्वांसाठी विनामूल्य आहे.
आपले आयुष्य योग व प्राणायामद्वारे निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन स्वामी विवेकानंद केंद्रातर्फे व्यवस्था प्रमुख अविनाश गोखले यांनी केले आहे.















