न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- कामगार नेते, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघाचे राज्य उपाध्यक्ष इरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत संघटनेच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कामगार नेते इरफानभाई सय्यद युवा मंचच्या माध्यमातून महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने, शुक्रवार (दि. १४) रोजी शाहुनगर येथील संघटनेच्या मुख्य कार्यालयात उपेक्षित व दुर्लक्षित तसेच असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदीत लाभार्थी बांधकाम कामगारांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या सहयोगाने सुरक्षासंच आणि अत्यावश्यक वस्तु संचाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात सुमारे ८०० कामगारांना सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी कामगार नेते इरफानभाई सय्यद, शिवसेना उपशहर प्रमुख युवराज कोकाटे, सचिन सानप, परशुराम आल्हाट व शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, संघटनेचे पदाधिकारी व सभासद कामगार आदी उपस्थित होते.















