न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- चिखली परिसरातून कुदळवाडीमार्गे पिंपरीगांवाकडे जाणाऱ्या पीएमपीएलच्या बसची फेरी पीएमपीएल प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता गेल्या काही दिवसांपासून बंद केली होती. ती आज शनिवार (दि. १५) रोजी पूर्वरत केली आहे. त्यामुळे गेली चार महीने दिलेल्या लढ्याला आज यश आले, असे स्वी. नगरसेवक दिनेश यादव यांनी सांगितले.
कुदळवाडीतून पिंपरी चिंचवड शहरात नोकरी-व्यवसायास जाणाऱ्या नागरिकांची यामुळे तारांबळ उडाली होती. चिखली परिसरातून कुदळवाडीमार्गे जाणाऱ्या बसची फेरी सुरु करावी, अशी मागणी होत होती.
यादव यांनी पीएमपीएल व्यवस्थापनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्याची दखल घेण्यात आली, असे यादव यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांच्या वतीने बसचालकांचा सत्कार करण्यात आला.















