न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०१९) :- अण्णासाहेब मगर सोशल फाऊंडेशतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात येते. यंदाचा युवा शैक्षणिक भूषण पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात गेली काही अनेक वर्षांपासून कार्यरत शिक्षणभूषण व उद्योजक धनंजय वर्णेकर यांना जाहीर झाला आहे.
जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा रविवारी (दि. १५) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. त्यावेळी वर्णेकर यांना अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
यावेळी अभिनेते सयाजी शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहूल जाधव, नगरसेवक शीतल शिंदे, नगरसेवक शैलेश मोरे, नगरसेविका माधुरी कुलकर्णी, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेविका जयश्री गावडे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष गुलाब बिरदवडे यांनी दिली.















