- पदपथावर मांडला ठिय्या..
- अपघात झाल्यास जबाबदार कोण?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. २२ जून २०२६ :- इंद्रायणीनगर परिसरात भटक्या जनावरांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून मुख्य रस्ते आणि पदपथांवर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीच्या गर्दीच्या वेळी ही जनावरे रस्त्यात येत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
पादचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेले पदपथही जनावरांच्या ताब्यात गेल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भटक्या जनावरांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे विविध ठिकाणी अधोरेखित झाले आहे.
स्थानिक नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेने तातडीने कारवाई करून भटक्या जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.















