न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. २२ जून २०२६ :- कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था, पुणे महाराष्ट्र राज्यची २०२६-२८ या कालावधीसाठी नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या संतोष कदम यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
संभाजीनगर येथील दत्त मंदिर हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. यावेळी कॅप्टन श्रीपत कदम, अशोक कदम, मनोहर यादव, गजानन मोरे, ज्ञानेश्वर कदम, नाना उतेकर, संदीप साळुंखे, रुपेश मोरे, अभिजीत कदम यांच्यासह सभासद उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष संतोष कदम यांनी कोकणातील युवकांना एकत्रित करून संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप कदम व सुरज उतेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अंकुर चव्हाण यांनी केले.















