न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. २२ जून २०२६ :- भारतीय जनता पक्ष पिंपरी-चिंचवड शहर उत्तर भारतीय प्रकोष्ठाच्या अध्यक्षपदी संतोष वशिष्ठ मुनी ओझा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी नियुक्तीपत्र देत ही घोषणा केली.
ओझा यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाची विचारधारा व विविध जनकल्याणकारी योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ते कार्य करतील, असा विश्वास नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
या नियुक्तीबद्दल संतोष ओझा यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून, उत्तर भारतीय समाज आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.















