- मोशीतील शासकीय जागा निशुल्क देण्यास कॅबिनेटची मंजुरी..
- आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. २२ जून २०२६ :- पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून शहरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) शाखा उभारणीला मोठी गती मिळाली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आयआयएमसाठी मोशी येथील शासकीय जागा निशुल्क उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आयआयएम नागपूरची विस्तारित शाखा मोशी येथे सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रकल्पासाठी महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महसूल विभागाने यापूर्वीच सकारात्मक भूमिका घेतली होती.
मोशी परिसराची उत्तम कनेक्टिव्हिटी, पुणे-मुंबईसह औद्योगिक आणि आयटी क्षेत्राशी असलेली जवळीक लक्षात घेऊन या ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. आयआयएमसारखी राष्ट्रीय दर्जाची संस्था शहरात येणार असल्याने पिंपरी-चिंचवडच्या शैक्षणिक आणि औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.














