न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड | दि. २२ जून २०२६ :-चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अनिता ताई काटे, उपाध्यक्षा, चॅलेंजर पब्लिक स्कूल, ज्योतिका मलकानी, प्राचार्या, तसेच स्नेहल पाटील, अपूर्वा पवार आणि प्रिती मानकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यान सत्रामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत निरोगी, सुदृढ व संतुलित जीवनासाठी योगाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचे आवाहन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, शिस्त, एकाग्रता आणि सकारात्मकतेचा संदेश रुजविण्यात आला.
कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने व प्रभावीपणे पार पाडले, ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.















