न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ जून २०२६) :- मयत व्यक्तीच्या नावाने बनावट इच्छापत्र तयार करून ते न्यायालयात सादर केल्याचा आरोप करत संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणूक व बनावट कागदपत्रांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अजित विष्णू चाळके (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २६ सप्टेंबर २०२० ते ७ मे २०२६ या कालावधीत मोरवाडी, पिंपरी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात फिर्यादीचे मयत वडील विष्णू भाऊराव चाळके यांच्या नावाने बनावट इच्छापत्र तयार करून ते न्यायालयात सादर करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात ८२ वर्षीय महिला तसेच अविनाश विष्णू चाळके (वय ६०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
संत तुकारामनगर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आटवे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
















