- महिला व दोन मुलांचे मृतदेह घरात आढळले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
ताथवडे (दि. २५ जून २०२६) :- ताथवडे येथील एका शाळेच्या मागील परिसरात एका घरात महिला आणि तिच्या दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
मृतांमध्ये कल्पना बिपीन सूर्यवंशी (वय ३५), शुभश्री बिपीन सूर्यवंशी (वय १७) आणि दादू बिपीन सूर्यवंशी (वय १०) यांचा समावेश आहे.
प्राथमिक तपासात महिलेने अन्नामध्ये विष मिसळून दोन्ही मुलांना दिल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. आर्थिक अडचणीमुळे हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशीही प्राथमिक शक्यता तपासात व्यक्त करण्यात येत आहे.
तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी वाकड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून विविध अंगांनी तपास सुरू केला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासातील निष्कर्षांनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
















