न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २५ जून २०२६) :- भोसरी एमआयडीसी परिसरातील बालाजीनगर चौकात भरधाव क्रेनच्या धडकेत ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी क्रेन चालकाला अटक करण्यात आली असून भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अनिल दुर्गादास चौगुले (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २३ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे वडील दुर्गादास यल्लाप्पा चौगुले (वय ६३) हे बालाजीनगर चौकात रस्ता ओलांडत होते. त्यावेळी एसकॉर्ट कंपनीची एमएच १४ जीवाय ४५९५ क्रमांकाची क्रेन भरधाव वेगाने चालवत असलेल्या चालक सरताज इरसाद अहमद (वय ३५) याने त्यांना समोरून जोरदार धडक दिली.
धडकेनंतर दुर्गादास चौगुले रस्त्यावर पडले. त्यानंतर क्रेनचे पुढील डावे चाक त्यांच्या कंबरेवर व उजव्या पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खोसे करीत आहेत.
















