- ॲड. सचिन गोडांबे यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | दि. ३० जून २०२६ :- पाचवी ते बारावीपर्यंतच्या सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत पीएमपीएमएल बस पास सुविधा तातडीने सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व मुक्त पत्रकार ॲड. सचिन गोडांबे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त आणि पीएमपीएमएल अध्यक्ष यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाढत्या महागाईमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवर बसभाड्याचा अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच हिंदुस्थान अँटीबायोटिक्स (एचए) सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी खासगी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी असलेली ७५ टक्के सवलतही कायम ठेवावी, जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सार्वजनिक वाहतुकीचा लाभ मिळेल, असे गोडांबे यांनी म्हटले आहे.















