न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | दि. ३० जून २०२६ :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात ठाकरे गटाचे चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश आबा नखाते व संघटिका सुजाताताई नखाते यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे तसेच माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते.
यावेळी गोरख पाटील, अमोल राठोड, एकनाथ मंजाळ, संभाजी नढे, काटे मामा, बाळासाहेब येडे, महादेव बिक्कड, कृष्णा येळवे, राम खमीतकर, सुधीर दुधमल, प्रजाक नढे, सुभाष काजारी, रोहित नखाते, लक्ष्मण टोणपे, मनीषा येडे, मनोज जगताप, अर्जुन गोरगेल आणि हर्षल धाकतोडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रमाला उपशहरप्रमुख दिलीप कुसाळकर, अंकुश कोळेकर तसेच विभागप्रमुख कानिफनाथ तोडकर आणि उमेश राजपूत उपस्थित होते.
















