न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३० जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड नगरीचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष तथा माजी खासदार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मरणार्थ दापोडी ते निगडी या मुख्य रस्त्याचे ‘कै. खासदार अण्णासाहेब मगर हमरस्ता’ असे नामकरण करण्यात आले. दापोडी येथे नामकरण फलकाचे अनावरण महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते झाले.
यावेळी शहर सुधार समितीचे सभापती संजय काटे, नगरसदस्य ॲड. नितीन लांडगे, राजू बनसोडे, माई काटे, प्रतीक्षा जवळकर, श्रुती वाकडकर, ज्येष्ठ इतिहासकार डॉ. राजा दीक्षित, सहशहर अभियंता मनोज सेठीया, उपआयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संजय काशिद, उपअभियंता संतोष कुदळे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, डॉ. सीमा काळभोर आदी उपस्थित होते.
महापौर रवी लांडगे यांनी अण्णासाहेब मगर यांच्या दूरदृष्टीमुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाचा मजबूत पाया रचला गेला असून, त्यांच्या नावाने मुख्य रस्त्याचे नामकरण केल्याने भावी पिढ्यांना त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल, असे सांगितले.
















