न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बदली व पदोन्नतीवर हजर झालेल्या अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात विविध विभागांचा कार्यभार सोपवला आहे.
यापूर्वी ८ सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे शहराचा कारभार होता. आता १० नव्या नियुक्त्यांमुळे ही संख्या १६ झाली आहे.
निलेश विश्वासराव देशमुख यांची वाहतूक शाखेत, सुदर्शन साईदास राठोड यांची गुन्हे-१ शाखेत, सुनील पांडुरंग पंधरकर यांची विशेष शाखेत, तर रोहिणी ज्ञानदेव बाणकर यांची सायबर व आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती झाली आहे. प्रशांत बाबासो ढोले यांच्याकडे पिंपरी विभाग, प्रिया देविदास ढमाळे यांच्याकडे महाळुंगे विभाग, मनीषा विश्वंभर कदम यांच्याकडे सांगवी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. सचिन तुकाराम कदम यांची गुन्हे-२ शाखेत, प्रवीण बाळासाहेब मोरे यांची देहूरोड विभागात, तर विठ्ठल खंडुजी कुबडे यांची हिंजवडी विभागात नियुक्ती करण्यात आली असून सर्व अधिकाऱ्यांना तातडीने कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.















