न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- मोशी येथील भैरवनाथ विघालयातील १९८९ सालची बँच चे विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन भोसरी येथे संपन्न झाले. ३० वर्षानंतर एकत्र आलेल्या संपन्न झालेल्या कार्यक्रमास पन्नास माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी हजर होते. सर्वांनी जुन्या स्मृतीना उजाळा दिला. तब्बल ३० वर्षानंतर शाळेत आल्यासारखे सर्व माजी विद्यार्थ्यांना वाटत होते.
यावेळी प्राचार्य गोवर्धन जाधव, बाळासाहेब सासवडे, एम डी आहेर, शंकर परांडे, रामचंद्र जमदाडे, दिलीप पारखे, शिरिष लोखंडे या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन माऊली भोपते, सुरेखा सुर्वे, संदीप जाधव, डॉ अशोक रोकडे, सदाशिव नेटके, शरद पाटील, नेव्ही अधिकारी संदीप खांडेभराड, रामकृष्ण लांडगे यांनी केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कामगार नेते प्रकाश मुगडे यांनी केले तर, आभार चंद्रभागा गौशाळा संस्था अध्यक्ष रामकृष्ण लांडगे यांनी व्यक्त केले.











