न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- ९ जुलैपासून महाराष्ट्रातील २० लाख रिक्षा चालक, मालक बेमुदत संपावर जाणार आहेत. याबाबत पुणे, पिंपरी चिंचवड शहराची भूमिका ठरविण्यासाठी पुणे येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ९ जुलै रोजी होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होण्याचा निर्णय रिक्षा चालकांनी एक मुखाने घेण्यात आला असल्याची माहिती कृती समिती सरचिटणीस आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी दिली.
रविवार (दि. १६) रोजी सकाळी ११ वाजता पुणे येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक (हॉल) येथे रिक्षा चालक मालकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री, परिवहनमंत्री यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून, ३० जून पर्यंत रिक्षा चालक मालकांचे प्रश्न सोडविण्याचे अवधन करण्यात आले आहे. ३० जून पर्यंत प्रश्न न सोडविल्यास ९ जुलै पासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना कृती समिती अध्यक्ष कामगार नेते शशांक राव म्हणाले रिक्षा चालकांचे अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. ३० जूनपर्यंत हे सर्व प्रश्न सोडवावेत या बाबत मुख्यमंत्री, परिवहनमंत्री यांना निवेदन दिले आहे. अन्यथा ९ जुलै पासून बेमुदत संप करण्यात येईल.
या वेळी बाबा कांबळे म्हणाले रिक्षा चालकांच्या मागण्या सरकारने सोडवल्या नाहीत. यामुळे रिक्षा चालकांमध्ये तिव्र संताप आहे. यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड मधिल सर्व रिक्षा चालक संपत सहभागी होतील
१) महाराष्ट्र राज्यातील ऑटोरिक्षाचे मुक्त परवाने वाटप बंद करा.
२) ऑटोरिक्षा चालकांसाठी परिवहन विभागामार्फत स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा.
३) ऑटोरिक्षाचे थर्ड पार्टी इन्शुरन्स दर तात्काळ कमी करा.
४) ऑटोरिक्षा व टॅक्सी व्यवसायात घुसखोरी करणाऱ्या ओला -ऊबेरवर कार्यवाही करुन त्या ओला-ऊबेरला हद्दपार करा
५) राज्यातील अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कार्यवाही करा
६) ऑटोरिक्षा चालकास पब्लिक सर्वन्ट हा दर्जा देण्यात यावे
७) राज्यातील जिल्हास्तरीय RTO च्या समितीवर एक अशासकीय सदस्य म्हणून एक ऑटोरिक्षा चालकास प्रतिनिधित्व देण्यात यावे
या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. मेळाव्यात कृती समिती अध्यक्ष कामगार नेते शशांक राव, सरचिटणीस बाबा कांबळे, उपाध्यक्ष मारुती कोंडे, प्रमोद घोणे, विजय पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष आणि शिवनेरी रिक्षा संघटना अध्यक्ष अशोक साळेकर, पुणे फेडरेशन अध्यक्ष बाबा शिंदे, पर्यदर्शनी रिक्षा संघटना अध्यक्ष आनंद तांबे, शिवाजी नगर एस टी स्टॅन्ड अध्यक्ष दत्ता पाटील, राष्ट्रवादी रिक्षा संघटना अध्यक्ष विजय रवळे, सावकाश रिक्षा संघटना अध्यक्ष प्रदीप भालेराव, पुणे स्टेशन रिक्षा संघटना अध्यक्ष सुरेश जगताप, श्री सेवा रिक्षा संघटना अध्यक्ष ठकसेन पोहरे, आशिर्वाद रिक्षा संघटना अध्यक्ष अनिल यादव, पुणे कॅन्टोमेन्ट रिक्षा संघटनेचे साई मोटाडू, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे राजू शिदगणे, लखन लोंढे, सोमनाथ कलाटे, सम्राट मुंडे, आरिफ पठाण, आदी उपस्थित होते.
शिला डावरे, प्रकाश झाडे, चंद्रकांत गोडबोले, आबा बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक साळेकर यांनी प्रास्ताविक केले. दत्ता पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी किशोर चिंतामणी, प्रतीक साळेकर, विलास बिराजदार, अशोक खानवरे, संजय देऊलकर, जयकुमार काची, गोरख पोहोरे यांनी संयोजन केले.











