न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- पिंपळे गुरव येथील श्री भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाची द्वैमासिक सभा झाली. या वेळी सभासदांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार यांच्यातर्फे १०० सभासदांना तुळजाभवानी मातेचा फोटो भेट देण्यात आला. नगरसेवक शशिकांत कदम यांची ‘ड’ प्रभाग प्रमुख म्हणून तिस-यांदा निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी संतोष तोतरे यांचे ज्येष्ठांच्या समस्या व उपाय या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी संघांचे अध्यक्ष रामचंद्र कदम, कार्याध्यक्ष मल्हारराव येळवे, बबनराव रावडे, जालंदर दाते, नागनाथ निळेकर, जनार्दन बोरोले, माणिक नागपुरे, रमेश तांबे, मीनाक्षी खैरनार उपस्थित होते.
मल्हारराव येळवे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीनिवास पानसरे यांनी आभार मानले.


















