न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- शैक्षणिक वर्ष उद्या (दि. १६) पासून सुरू होत आहे. महापालिका तसेच खासगी संस्थांच्या शाळांमध्ये नवोगत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आणि इतर विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देण्यात येणार असून खाऊ वाटप करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या १०५ शाळांमध्ये हा प्रवेशोत्सव होणार आहे. या निमीत्त शाळांच्या सजावटींचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पताका, रांगोळी काढून शाळा सुशोभित करण्यात आल्या आहेत. यावेळी संबधित शाळांच्या परिसरातील नगरसेवक, पदाधिकारी यांच्या उपस्थितित विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.


















