न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १० जुलै २०२६) :- मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प परिसरातील दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी मेडिकव्हर व साईनाथ रुग्णालयात जाऊन भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.
जखमी व त्यांच्या नातेवाईकांना धीर देत महापालिका सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी डॉ. सुहास कांबळे, महापालिकेचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
जखमींना सर्वोत्तम उपचार मिळावेत, आवश्यक शासकीय समन्वय तातडीने साधावा आणि बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत द्यावी, अशा सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

















