- एफएसआय मंजुरीत मोफत खाटांची अटच राहिली नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १० जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील काही खासगी रुग्णालयांना वाढीव एफएसआय मंजूर करताना गरीब व गरजू रुग्णांसाठी मोफत खाटा राखीव ठेवण्याची अट करारात समाविष्ट केली नसल्याची धक्कादायक बाब विधानसभेत उघड झाली.
चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना राज्य सरकारने ही बाब मान्य केली. बिर्ला हॉस्पिटल (थेरगाव) आणि डी. वाय. पाटील हॉस्पिटल (पिंपरी) यांना वाढीव एफएसआय देण्यात आला असला, तरी मोफत उपचारांची अट नसल्याने गरीब रुग्ण हक्काच्या सुविधेपासून वंचित राहिल्याचा आरोप जगताप यांनी केला.
भविष्यात कोणत्याही रुग्णालयाला वाढीव एफएसआय किंवा जागा देताना मोफत अथवा सवलतीच्या उपचारांची अट बंधनकारक करावी. तसेच विद्यमान करारांची फेरतपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.

















