- सचिन काळभोर यांची महापालिका प्रशासनाकडे कारवाईची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १० जुलै २०२६) :- निगडी येथील भक्ती-शक्ती उड्डाणपुलावरील गोलाकार भागात पावसाच्या पाण्यामुळे मोठे भगदाड पडल्याचा दावा करत भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.
महात्मा बसवेश्वर पुतळा ते अंकुश चौक ग्रेड सेपरेटर मार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करून नागरिकांच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सन २०१८ ते २०२० दरम्यान सुमारे १४५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
संबंधित ठेकेदार कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून नुकसानभरपाई वसूल करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री, पुणे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार सादर केल्याचे काळभोर यांनी सांगितले.

















