- माजी आमदार रवींद्र धिंगेकर यांच्या हस्ते उद्घाटन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १० जुलै २०२६) :- संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तसेच संत रोहिदास महाराज दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत, बाबा सामाजिक फाउंडेशन व सहयोगी संघटनांतर्फे १६ मोफत सेवांचा शुभारंभ करण्यात आला.
दारूवाला पूल येथील संत देवजी बाबा मंदिरासमोर झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार रवींद्र धिंगेकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे (माऊली) होते.
या उपक्रमांतर्गत मोफत रिक्षा सेवा, प्रथमोपचार, आरोग्य तपासणी, औषधोपचार, पिण्याचे पाणी, अन्नदान, फळवाटप, चहा-बिस्किट, मोबाईल चार्जिंग, बूट-चप्पल दुरुस्ती व चरणसेवा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. वारकऱ्यांच्या सेवेसाठी अधिकाधिक रिक्षाचालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. बाबा कांबळे यांनी केले.
















