- अक्षय सावंत मृत घोषित; शोधमोहीम सुरूच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील बचाव आणि शोधमोहीम शनिवारी (११ जुलै) आजही दिवसभर सुरूच आहे. दुपारी सुमारे २.३० वाजता शोध पथकाला अक्षय सावंत हे ढिगाऱ्याखाली आढळून आले. त्यांना तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
त्यानंतर सायंकाळी ५.१० वाजण्याच्या सुमारास शोधमोहीमेदरम्यान सुनील कोरके (वय ४०, रा. आळंदी) हे देखील ढिगाऱ्याखालून आढळून आले. त्यांनाही तातडीने उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
घटनास्थळी महापालिका, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच इतर यंत्रणांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू असून, अद्याप सहा जण अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जेसीबी, पोकलेन आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम सुरू असून, बचाव पथकांकडून प्रत्येक भागाची कसून तपासणी करण्यात येत आहे.
















