- सन्नी माने, महेश कुंभार, नागेश गायकवाड, रणजीत पाटील यांचा समावेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या शोध मोहिमेत शनिवारी सायंकाळी आणखी तीन जण आढळून आले आहेत. या तिघांनाही पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
सायंकाळी ६ वाजता सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान सन्नी माने (वय ३९, रा. गंधर्वनगरी, मोशी) आढळून आले. त्यानंतर सायंकाळी ६.१० वाजता महेश कुंभार (वय ३३, रा. छत्रपती संभाजीनगर), तर ६.२० वाजता नागेश गायकवाड (वय २६, रा. संजय गांधी नगर, मोशी), रणजीत पाटील (वय २२, मोशी) आढळून आले.
शोध पथकाने तिघांनाही घटनास्थळावरून बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविले. दुर्घटनास्थळी शोध मोहीम सुरू असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
मृत नागरिकांची नावे :-
१) अक्षय सावंत (वय ३५, मोशी)
२) सुनील कोरके (वय ४०, आळंदी)
३) सन्नी माने (वय ३९, गंधर्वनगरी, मोशी),
४) महेश कुंभार (वय ३३, छत्रपती संभाजीनगर),
५) नागेश गायकवाड (वय २६, संजय गांधी नगर, मोशी)
६) रणजीत पाटील (वय २२, मोशी)

















