न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- पहाटे अंगद त्यांच्या रिक्षांमधून प्रवासी भाडे घेऊन जात होते. ते सांगवी फाट्याजवळील ब्रिजजवळ आले असता, भरधाव वेगात आलेल्या एका स्विफ्ट कारने (एमएच ०४ / सीटी १३०९) त्यांच्या रिक्षाला धडक दिली.
या अपघातात रिक्षामध्ये बसलेल्या एका प्रवाशाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. अपघाताची खबर न देता कारचालक पळून गेला. ही घटना रविवारी (दि. १६) रोजी पहाटे जुनी सांगवी येथे घडली.
अंगद विनायक तरंगे (वय ३१, रा. मारुंजे) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार स्विफ्ट कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सांगवी पोलीस तपास करीत आहेत.















