- आकुर्डीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा; पुनावळ्यात बसच्या चाकाखाली मुलीचा मृत्यू…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड परिसरात दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. आकुर्डी-चिंचवड लिंक रोडवर अज्ञात दुचाकीस्वाराने पायी जाणाऱ्या राजाराम जनार्धन माने (वय ६०) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या माने यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीस्वाराने वैद्यकीय मदत न करता तसेच पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून पलायन केले. निगडी पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत पुनावळे येथील पवना ब्रिजजवळ पीएमपी बसने ओव्हरटेक करताना स्कुटीला धडक दिली. या धडकेमुळे स्कुटीचा तोल जाऊन फिर्यादीची मुलगी खुशबू बसच्या मागील चाकाखाली सापडली. यात तिचा मृत्यू झाला. रावेत पोलिसांनी बसचालक सय्यद शब्बीर मुलानी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

















