- रविवारी ‘HYROX Style Challenge’ अंतगर्त ‘Chil-Rox-Find Kids Power’ चा दिसणार तडाखा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ जुलै २०२६) :- आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रिय ठरत असलेली HYROX शैलीतील फिटनेस स्पर्धा आता प्रथमच रहाटणी परिसरातील मुलांसाठी आयोजित करण्यात आली आहे. ”बॉडी क्राफ्ट फ्युचर फिट”च्या वर्धापनदिनानिमित्त ‘Chil-Rox – Find Kids Power’ या विशेष उपक्रमांतर्गत Body Kraft Anniversary Special HYROX Style Challenge for Kids या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा रविवार, १९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत काकाज इंटरनॅशनल स्कूलसमोर, रहाटणी येथील बॉडी क्राफ्ट फ्युचर फिट येथे होणार आहे. ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुले आणि मुली या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
स्पर्धेमध्ये मुलांसाठी धावणे, बॅटल रोप, केटलबेल, मेडिसिन बॉल, वजन उचलणे तसेच ताकद, वेग, समतोल आणि सहनशक्ती वाढविणाऱ्या विविध फिटनेस अॅक्टिव्हिटींचा समावेश करण्यात आला आहे. परदेशात लोकप्रिय असलेल्या HYROX संकल्पनेवर आधारित या स्पर्धेचा उद्देश मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करणे, आत्मविश्वास वाढवणे, शारीरिक तंदुरुस्ती सुधारणे आणि खेळातून नवीन मित्र जोडण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
आयोजकांच्या माहितीनुसार, प्रत्येक स्पर्धकाला उत्साहपूर्ण वातावरणात फिटनेसचा वेगळा अनुभव मिळणार असून, सहभागी मुलांना त्यांची शारीरिक क्षमता आजमावण्याची संधी मिळेल. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचा या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी : 8788324641 / 8390095433.

















