- ४०.८३ कोटींचा दंड; हेल्मेट, सिग्नल जंपिंग व फॅन्सी नंबर प्लेटवर विशेष मोहीम..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १४ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने १ जानेवारी ते ३० जून २०२६ या कालावधीत वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत ४,०१,७८७ प्रकरणांमध्ये तब्बल ४० कोटी ८३ लाख २९ हजार ९०० रुपये दंड आकारला आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार, सहआयुक्त शशिकांत महावरकर व अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. फॅन्सी नंबर प्लेट, मोबाईलवर बोलणे, सिग्नल जंपिंग, ट्रिपल सीट, विना हेल्मेट, काळी काच, मॉडिफाईड सायलेंसर, रिक्षा, बस आणि जड वाहनांवरील नियमभंगावर विशेष कारवाई करण्यात आली.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून दंडात्मक व न्यायालयीन कारवाई टाळावी तसेच वाहतूक समस्यांसाठी ‘ट्रॅफिक बडी’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट (८७८८६४९८८५)चा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त विक्रांत देशमुख यांनी केले आहे.

















