- सांगवीतील माहेश्वरी चौक परिसरातील घटना; स्टीलच्या कड्याने हल्ला केल्याचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. १४ जुलै २०२६) :- नवी सांगवीतील माहेश्वरी चौक ते एम.एस. काटे चौक मार्गावरील सुरुची हॉटेलसमोर रस्ता ओलांडत असलेल्या १७ वर्षीय विद्यार्थ्याला दुचाकीचा धक्का लागल्यानंतर झालेल्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली.
याप्रकरणी सांगवी पोलिसांनी सिद्धार्थ कांबळे आणि आयुष तुळजाराम वाल्मिकी या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हर्षवर्धन निशांत काळे (वय १७, रा. नवी सांगवी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी बेदरकारपणे दुचाकी चालवून धक्का दिल्यानंतर जाब विचारल्याचा राग मनात धरून शिवीगाळ, धमकी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच एका आरोपीने हातातील स्टीलच्या कड्याने डाव्या डोळ्याजवळ व गालावर वार करून चष्मा फोडल्याचा आरोप आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत असून आरोपींच्या अटकेची कार्यवाही सुरू आहे.
















