न्यूज पीसीएमसी नेटवर्क
थेरगाव प्रतिनिधी :- नगरसेवक अँड. सचिन भोसले यांनी थेरगाव परिसरातील प्रभाग क्रमांक २४ येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानाच्या समस्यांसंदर्भात उद्यान विभाग अधिकारी मोरे यांची उद्यानस्थळी भेट घेऊन त्यांना उद्यान परिसरातील समस्यां मार्गी लावण्याचे आदेश दिले.
उद्यानातील खराब झालेले लाँन पुन्हा लावण्यात यावेत, उद्यानातील सभामंडपास लोखंडी जाळी बसवून दरवाजा बसविण्यात यावा, स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून स्वच्छ करण्यात यावेत, पाण्याच्या टाकीला उंच विटेची भिंत करण्यात यावी व उद्यान परिसरात सी. सी. टीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्राची जागा वाढवून देण्यात यावी आदी सूचनावजा आदेश नगरसेवक भोसले यांनी उद्यान विभाग अधिकारी मोरे यांना दिल्या.
सर्व समस्या त्वरित मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन उद्यान विभाग अधिकारी मोरे यांनी यावेळी दिले. यावेळी प्रभागातील नागरिक उपस्थित होते.











