न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विद्यमान सदस्य आणि माजी उपाध्यक्ष विशाल ऊर्फ जिंकी खंडेलवाल यांच्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.
आरोपीचा भाऊ आणि मित्र यांच्यावर मागील काही दिवसांपूर्वी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये खंडेलवाल यांनी पुढाकार घेऊन देहूरोड बाजारपेठ बंद ठेवल्याचा राग आल्याने दोघांनी मिळून १३ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास खंडेलवाल यांच्यावर गोळीबार केला.
देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली असून साबीर समीर शेख (वय १९, रा. तळेगाव स्टेशन), साईतेजा ऊर्फ जॉनी शिवा चिंतामल्ला (वय १९, रा. ऑर्डीनन्स फॅक्टरी, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल देखील जप्त केले आहे.















