विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- विद्यार्थ्यांच्या जड़न घड़नीत आणि यशात आई-वडिलांप्रमाने समाजाचेही योगदान अमूल्य असते, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस तथा मुंबई जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य अमोल जाधव यांनी केले.
कासारवाड़ी येथील नियोजित भाजी मंडई संकुलात भाजप युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर गणेश संभेराव आणि गणेश जवळकर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १० वी, १२ विच्या ७० टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा जाहिर सत्कार आणि मार्गदर्शन सोहळा आज पार पडला. या सोहळ्यात ते मार्गदर्शन करतांना बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना अमोल जाधव म्हणाले की, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सुरुवातीला मा सरस्वती यांच्या प्रतिमेला हारार्पन करून दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे उपस्थित मान्यवारांना वृक्ष देवून स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून अण्णाभाऊ विकास मंडळचे अध्यक्ष अमित गोरखे, भाजपा दक्षिण आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, चिटनीस अनूप मोरे, नगरसेवक माऊली थोरात, कुणाल लांडगे, प्रकाश जवळकर, वैशाली खाडे उपस्थित होते.
सोहळ्याचे आयोजक गणेश संभेराव, गणेश जवळकर आणि मित्र परिवार यांनी आयोजन केले.















