न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०१९) :- मोशी कचरा डेपोमध्ये नव्याने होणाऱ्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाअंतर्गत तयार होणाऱ्या १००० टन प्रतिदिन क्षमतेच्या मटेरियल रिकव्हरी फॅसेटिक (MRF) प्रकल्पाची व प्लॅस्टिक पासून इंधन निर्मितीची पाहाणी महापौर राहुल जाधव यांनी आज सोमवार (दि. १७) रोजी केली.
प्लॅस्टिकपासून ग्रॅन्युअर (प्लॅस्टिकचे दाने) फ्लेवर ब्लॉक बनविणे, तसेच बांधकामाच्या राडारोड्यावर प्रक्रिया करणाऱ्या फ्लॅटची पाहणीही त्यांनी केली. तसेच त्या ठिकाणी महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थापत्य पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, एस. एस. एन. इन्फ्रा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदरचे प्रकल्प निवडणुकीपूर्वी पूर्ण करणेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.















