न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयांवर होत असलेले हल्ले लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेने नगरसेवकांच्या संपर्क कार्यालयाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांनी केली आहे.
यासंदर्भात खानोलकर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे. त्यात संपर्क कार्यालयाशेजारील दुकानांवर हल्लेखोरांनी केलेला हल्ला, माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांच्यावर झालेला हल्ला, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्यांबाबत उल्लेख करण्यात आला आहे. किवळे येथील संपर्क कार्यालयाजवळील चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशीही मागणी खानोलकर यांनी केली आहे.















