न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- महापालिका व पर्यावरण संवर्धन समितीतर्फे (ईसीए) मागील वर्षभर पर्यावरणावर आधारित विविध उपक्रम राबवण्यात आले होते. यात सहभागी ९७ शाळांतून थेरगाव येथील खिंवसरा पाटील विद्यामंदिर शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. शहरातील एकूण सहाशे शाळांपैकी ९७ या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.
उत्तम उपक्रम व स्पर्धेत कामगिरी केलेल्या ९७ शाळांपैकी अंतिम १३ शाळांची निवड झाली. त्यापैकी खिंवसरा पाटील विद्यामंदिर शाळेला महापौर
राहुल जाधव यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले.
यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, माजी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, पर्यावरण समितीचे संजय कुलकर्णी, पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, सीमा आखाडे, दिपाली नाईक, नीता साळवे, पुष्पा जाधव, वनिता बकरे आदी उपस्थित होते.















