न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी आणि अतिक्रमण विरोधी पथकाने भोसरीतील इंद्रायणीनगर, स्पाईन सिटी मॉल चौक परिसरात सोमवारी (दि. १७) रोजी कारवाई केली.
या कारवाईत २ चारचाकी टेम्पो, १० हातगाड्या, २ टप-या, ७ काउंटर, १ जनरेटर तसेच विक्रीचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच, चिकन विक्रीच्या ५ टपऱ्या व २ रसवंतीगृह जमीनदोस्त करण्यात आले. पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक, पोलिस, मजूर, जेसीबी यांच्या सहाय्याने ही कारवाई केली गेली.















