न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- पूर्ववैमनस्यातून सात जणांच्या टोळक्याने तरूणावर सशस्र हल्ला चढवला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ८ जून रोजी रात्री दहच्या सुमारास स्पाईनरोड, चिंचवड येथे घडली.
जयभीम उर्फ भावड्या भिका भालेराव (२४, रा. स्पाईन रोड, चिखली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार बबल्या रंधवे, जाकीर उर्फ डॅनी पठाण, दादा गवळी, आदर्श उर्फ छोट्या मगर, सुशांत झिटे, शुभम काळभोर, रोहित उर्फ चिकण्या रुपेश खोत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी भालेराव स्पाईन रोडवरील विनायक स्वीट होम समोर मित्र आणि आईशी गप्पा मारत उभे होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या आरोपींनी पूर्वीच्या भांडणांचा राग मनात धरून, त्यांच्यावर लोखंडी कोयत्याने वार केले. काही आरोपींनी भालेराव यांच्यावर दगडफेक केली. यामध्ये भालेराव गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुणालयात उपचार सूरू आहेत.















