न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर झाली असून शहरात ७ अनधिकृत शाळा आढळल्या आहेत. पालिकेकडून सूचना करूनही अद्याप काही शाळांनी मान्यता मागविण्यात टाळाटाळ केल्यामुळे या शाळांना अनधिकृत ठरविण्यात आले आहे.
दरम्यान, यंदाच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाकडून अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण सुरू होते. त्या सर्वेक्षणातून शहरात ७ अनधिकृत शाळा आहेत. गेल्या वर्षी महापालिकेच्या हद्दीत एकूण १८ अनधिकृत शाळा आढळल्या होत्या. त्यापैकी इतर शाळांनी मान्यता आणली असून, ७ शाळांची मान्यता येणे बाकी आहे. त्या संबंधित शाळांना नोटीसही बजावल्या जात आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत या शाळा सुरु आहेत.
या आहेत अनधिकृत शाळा :-
ग्रंट मीरा इंग्लिश मीडियम स्कूल, कुदळवाडी, स्मार्ट इंग्लिश स्कूल, मोशी प्राधिकरण, मॉडर्न पब्लिक स्कूल, रहाटणी, ज्ञानराज प्राथमिक शाळा, कासारवाड़ी ( मराठी ), पुणे इंटरनॅशनल स्कूल, पिंपळे गुरव, मास्टर केअर इंग्लिश मीडियम स्कूल, आळंदी रोड, ज्ञानराज स्कूल स्कूल, भोसरी (इंग्रजी).















