न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- शहर विकास आघाडी युवती विभागाच्या वतीने राजमाता जिजाऊ यांना स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी युवती अध्यक्ष दुर्गा भोर, सायली पवार, नम्रता खंडागळे, अश्विनी साळुखे, स्वप्नाली पवार, सायली डावरे, अवंतिका भोर, ऐश्वर्या थिटे या युवती उपस्थित होत्या.
याप्रसंगी सर्व युवतींनी राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्याचा संकल्प केला. सध्या अनेक तरुणी बेकार आहेत. सुशिक्षित बेकार तरुणींसाठी नवीन उद्योग व्यवसाय करण्यासाठी एकत्र येऊन काम करण्याची ताकद निर्माण करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच युवा हेल्पलाइन सुरू करण्यात येईल. त्याद्वारे बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे युवती अध्यक्ष दुर्गा भोर यांनी सांगितले.















