- आयुष्मान भारत व महात्मा फुले योजनेतून पात्र रुग्णांना पाच लाखांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ जुलै २०२६) :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौर वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे उद्घाटन आयुष्मान भारत योजनेचे राज्य प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कक्षामार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महापौर सहाय्यता निधी, आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनांचा लाभ पात्र नागरिकांना सुलभपणे मिळणार आहे.
आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध होणार असून अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, रुग्णालयांशी समन्वय आणि उपचारासाठी दोन ‘आरोग्यमित्र’ मार्गदर्शन करणार आहेत.
महापौर रवि लांडगे यांनी, आर्थिक अडचणीमुळे कोणताही नागरिक उपचारांपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे सांगितले. यावेळी आमदार अमित गोरखे, उमा खापरे, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

















