- चार कुटुंबांच्या खात्यात प्रत्येकी १० लाखांची मदत; उर्वरित लाभार्थ्यांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात….
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २२ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया पिंपरी-चिंचवड महापालिकेने वेगाने सुरू केली आहे. महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार कागदपत्रांची पूर्तता झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
आतापर्यंत मृत अक्षय सावंत, सन्नी माने, राहुल गायकवाड आणि वामन कसबे यांच्या वारसांच्या खात्यात नियमानुसार प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. तर भावेश वाणी, सुनील कोरके, महेश कुंभार, नागेश गायकवाड आणि रणजीत पाटील यांच्या वारसांच्या कागदपत्रांची पडताळणी व प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ती पूर्ण होताच त्यांच्या खात्यातही आर्थिक मदतीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

















