न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०१९) :- पिंपळेनिलख परिसरातील काही सोसायट्यांमध्ये दोन दिवसांपासून दुषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याबाबत नगरसेवक तुषार कामठे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांची भेट घेऊन त्यांना दुषित पाणीपुरवठ्यासंदर्भात निवेदन दिले.
या निवेदनात कामठे यांनी म्हटले की, पिंपळेनिलख परिसरातील अनुप्रभा सोसायटी, सुधाकलश सोसायटी, आदित्य बंगला अशा विविध परीसरात दुषित पाणीपुरवठा होत आहे. या दुषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तत्काळ दुषित पाणीपुरवठा थांबवावा, असे या निवेदनात कामठे यांनी म्हटले आहे.
परिसरात ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्याची लाईन मिक्स झाल्यामुळे दुषित पाणीपुरवठा झाला असेल, असा अंदाज आहे. ही कामे तत्काळ पूर्ण कऱण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. – श्रावण हर्डीकर (आयुक्त, पिं. चिं, मनपा)











