न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०१९) :- रावेत येथे स्वप्नपूर्ती होसिंग सोसायटीच्या मागे रावेत निगडी बीआरटी मार्गाजवळ अनोळखी गृहस्थाचा मृतदेह सायंकाळी आढळून आला. देहूरोड पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वायसीएम रूग्णालयात हलविला आहे.
रावेत येथे बीआरटी मार्गाजवळ मोकळ्या माळरानावर अज्ञात गृहस्थाचा मृतदेह आढळून आला. वय अंदाजे ३५ वर्ष, गहूवर्ण, काटक बांधा, उभट चेहरा, चौकटी रेषांचा निळ्या रंगाचा शर्ट, निळी जीन्स पॅन्ट असे त्याचे वर्णन आहे. त्याच्या खिशात मोबाईल फोन सापडला असून त्यावर एकाच क्रमांकावरून सुमारे ७० मिस कॉल आल्याचे दिसन आले. ]
पोलिसांनी संबंधितांशी संपर्क साधला असून, ते नांदेड येथील मुखेडमधील असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिस नाईक संतोष बगाड तपास करीत आहेत.













